सद्गुरु कोरेश्वर महाराज गोशाळा, श्री राधेश्याम कुलकर्णी ( संस्थापक अध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट २०१७ साली सुरु झाली.
ही गोशाळा एका गोमातेच्या सेवेपासून सुरू झाली असून सध्या या गोशाळेत २५ ते ३० गोमातेंची सेवा होत आहे.
या सर्व कार्य श्री ओंकारदेव वासुदेव मुळे आणि त्यांचे सहकारी मनोभावे आणि कठीण परिश्रमाने सेवेत रुजू आहेत.
विविध जातीच्या गोमाता या गोशाळेमध्ये सेवेसाठी आहेत. तसेच इथे गोमाता आणि नंदी भगवान वास्तव्य करतात.
२०२१ पासून या गोमात्यांच्या द्रव्यांपासून म्हणजेच गोमुत्र, दुध, शेण, दही, तूप यांपासून विविध औषधे तयार करत आहोत. यालाच पंचगव्य असे म्हणतात.
पंचगव्य प्रक्रियेने तयार केलेली औषधे विविध व्याधींवर चालतात. सर्दी पासून तर कॅन्सर पर्यंत सर्व व्याधींवर औषधे तयार केली जातात. येणाऱ्या कालावधीमध्ये निसर्गोपचार केंद्र , वारकरी शिक्षण संस्था सुरू करणार आहोत